Saturday, July 20, 2019

move on.
======================
गाडीची हौस भागवली जर टांग्यावर
वाड्याचं तेल पडणारच वांग्यावर
वांग्याचं करा आता भरीत
बाकी सगळं घाला चुलीत

Thursday, July 18, 2019

प्रॉब्लेम सॉल्व्हर्स प्रॉब्लेम

घरात माझ्या सतत उत्पात
नेटाने प्रश्नांवर करतो प्रघात
हृदयावर माझ्या अनेक आघात
तरीही निरुपयायोगी मीच सगळ्यात 

Saturday, July 13, 2019

लबाड रोमियो

लबाड रोमियो
===========================
जीभ अजूनही चावली का जाते इतक्या जोरात?
तू राहात नाहीस ग आता माझ्या हृदयात
घेतल्या होत्याखऱ्याच आणाभाका
लक्षात ठेवेन तुला, असेपर्यंत मी हयात
पण काय करू? विसरलो मी आता
कारण गोंडस बायको आहे घरात

अनुभवी चाळणी

त्याच त्याच जुन्या आठवणी
जुन्या सवयी पडल्या अंगवळणी
दोन्हीशिवाय जीवन अळणी
आणि वास्तविकतेशी सतत फाळणी

Saturday, July 06, 2019

The boiling frog

माझ्या टीकांचा मलाच बसतो चटका
चटका बसला तरी बसलोय टिकून
टिकून बसलो म्हणूनच नाही आता सुटका
सुटकेचा मार्गच नाही, कसे काय सटका?

माकडचाळे


माझ्या मनाचा मलाच लागतो चटका
द्या कुणी तरी मलाच माझ्यापासून सुटका
बसुद्या शांत,  दोन घटका
मनातल्या माकडांनो इकडून लगेच सटका

Wednesday, July 03, 2019

लुप्त

मी वेगळाच, ठोकून देतते जनता बेलाशक
सगळेच सारखे, नाही काही यात शक
गम्मत बघण्यास हजारों संख्येने हजर दर्शक
डोळादेखत अदृश्य, मुळातच मी पारदर्शक


Tuesday, July 02, 2019

बेजार गुलजार

मानवजातीस झालाय आजार
प्रत्येक गोष्टीचा भरवतो बाजार
हातावर टेकवताच रक्कम हजार 
विकण्यासहि तयार, नेसती विजार 


 

कोडे

मोठ्ठ्या कवटीत मेंदू लहान
डुंबत डुंबत करतो स्नान
ओळख पाहू मी कोण?

वय-उतारवय

दिवसामागून जातात दिवस, वाढत जातं वय
शाळेत वर्षाॅमागून जातात वर्ष, परीक्षांचं सतत भय
नोकरी-चाकरी, पगार हफ्ते, नको त्या गोष्टिंची सवय
लग्न होताच जीवनात येतो मोठ्ठा प्रलय
बायकोमुळे हेलपाट्यांनाही लागते मंजूळ लय

नवराबायकोंच्या या संसाराची तुटणार नाही लय
कितीही मोठा आला जरी प्रलय
सगळ्याचीच झालीय सवय
कशाचच नाही आता भय
पोरासोरांचही आता वाढू लागलंय वय

वाह्यात तरुणाई

======================
ब्रम्हचारी त्याला कोण विचारी
अविचारी सेवन, सवयीपाई लाचारी
भिकारी वर्तन, बघताच येते शिसारी
सुपारी पान सदा मुखी, तंबाखुची पिचकारी