Tuesday, August 13, 2019

नश्वर


आत्ता नको, नंतर कधीतरी
असे म्हणून सतत पुढे ढकलायचे
मुढापरी विश्वास ठेवून
मोजकेच असलेले हे श्वास अजून किती उधळायचे
हे नश्वरा, जगण्याचे गुपित तुला कधी कळायचे ?





Saturday, August 03, 2019

वहाणप्रेमी मैत्रीमैत्रिणींस समर्पित

व्यवहारसाठी ती(तो)फारच अजाण
क्षुल्लकशी घेण्यासाठी वहाण
तिने(त्याने) ह्रदयच ठेवले गहाण
त्यानंतर सगळीच झाली घाण

सुट्टीचा कार्यक्रम

कधी खेळू विट्टी दांडू
तर कधी बघू फळकूट चेंडू
कधी बागेत पेरू झेंडू 
तर कधी नुसतेच फिरू हिंडू

घरघुती बागकाम

प्रवेशदारी विखूरलेले होते बारीक दगडधोंडे
ईकडेतिकडे, सगळीकडे चिखलाचे शिंतोडे
बघून माखलेले इवले इवले जोडे
क्षणात सुटले मला पडलेले कोडे

स्मृतीं

आयुष्यभर बाळगली हक्काने स्वःताची झोळी
वजनही वाढवलं, खाऊन रोज गर्वाची गोळी
अचानक जमली अवतीभवती बघ्यांची टोळी
उंच, ढेंगणी, तर काही पांढरी, काळी
झटक्यात उघडली त्यांनी माझी झोळी,
येताच माझी पाळी
होती त्यात फक्त जुन्या अनुभवांची खिचडी शिळी

अनुभूती

समुद्र तोच, पण प्रत्येक लाट नविन
सुर्य तोच, पण प्रत्येक सकाळ नविन
चंद्र तोच, त्याचे भांडवल करणारा प्रत्येक रोमियो नविन
वेळही रोज तीच, पण क्षणोक्षणी काळ नविन
मेंदू तोच, पण विचार नविन
शरीरहि तेच, करामती नविन
चारोळ्यांचे विषयही तेच, उपरती नविन

भानामती

कुणास ठाऊक कुणी केली भानामती
भानहि नाही राहत, मंद होऊ लागली मती
अजून किती चुका करणार जमा अक्कलखाती
दिवसागणिक, अवघड होतंय ढकलणं रती