Tuesday, December 31, 2019

आत्मविश्वास

आपलंच आपल्याभोवती असावं  असं वलय
जरी आजूबाजूला आला कितीही मोठ्ठा  प्रलय
वाटणार नाही कशाचंच भय
नेटाने चालत राहता यावं पुढे, पकडून आपली लय

सवयीचे जोडे

वाढत जातं जसं जसं वय
फाटक्या जोड्यांचीही जरा जास्तच होऊ लागते सवय
ते घालून चालवण्यात असते एक विशिष्ट लय
अन् अनुभवांमुळे वाटत नाही कशाचेच भय

विरंगुळा

प्रत्येकालाच हवा विरंगुळा
गुरफटतो मुखपुस्तकात दिवसातून दहा वेळा
चावलाच कधी पायास मुंगळा
रडण्याआधी टाकतो स्टेट्स - चावला मुंगळा, रडतोय कळावळा.

परीट

बघून कपड्यांचा पसारा
आला मला खुपच वीट
बोलावला मी एक परीट
परीट निघाला भलताच धीट
म्हणाला, ठेवत नाही तुम्ही कपडे नीट
आता मीच ठेवून घेतो सगळे कपडे
मलाच होतील मस्त फिट

दिलफेक आंशिक

वातावरण झालं होतं फारच गार
तुझ्या प्रेमाने केलं मला बेकरार
तेव्हाच केला मी माझ्याशीच करार
तुझ्यात नी माझ्यात
मी कधीच पडू देणार नाही दरार
मला माहिती आहे तुझी तक्रार
थंडीने या तूहि झाली आहेस खूपच बेजार
कवेत ये माझ्या कविते
मीच आहे तुझा गुलजार

कानमंत्र

घडवायचं असेल परीवर्तन
तर बदलावेच लागेल वर्तन
चालणार नाही करुन फक्त किर्तन

परिवर्तन

काना, मात्रा वेलांट्या
यांत अडकते ते शाब्दिक नर्तन

भावना पोहोचवते ते कीर्तन
आणी जे घडवते परिवर्तन
तेच खरे वर्तन

खंत

हेटाळणी फेटाळणी सतत
होउ लागलय सगळंच अळणी
जळी स्थळी पाषाणी
सतत सगळीकडे पाणचट पाणी

Wednesday, December 18, 2019

हाॅलिडे स्पेशल

कुणी खातो धक्के
कुणी मारतं बुक्के
काही असतात खरे
तर काही खोटे सिक्के

बायको

नियतीने मांडला पट
त्यात कधी होते पुढे वाटचाल पटापट
तर कधी पडते दान उलटे, उगाचच होते घट
दु:ख, संकट आले जरी चालून
रोखतेस त्यांना शिताफिने,
कधीच ओलांडू देत नाहिस तट
तुझ्यासमोर नियतीचीही चालत नाही वट

अनभिद्यन कि विरक्त?

निळ्या आकाशास काळ्या ढगांचे व्यंग
व्यंगातूनच झाले निर्माण ईंद्रधनुष्याचे रंग
उंच नभी उडतो विंहग
त्यास ना व्यंगाचे वावगे, ना रंगांचे कौतुक
तो मुक्त उडण्यात दंग

कल्पना विलास

सिंह झाला म्हातारा
दातांवर दात घासतो कराकरा
त्याच्या डरकाळीही उरला नाही दम
शेळीही मारते त्याला बेदम

प्रश्नांत मग्न

टपरीवर बसून प्यावा चहा
येतां जाता रस्त्यावरच्या गाई म्हशी पहा
असचं तर झालं आमचं काॅलेजचं शिक्षण
वडीलधार्यांना वाटलं, पोरांचं ठिक नाही लक्षण
शिस्त लागेल, लावून दिल्यावर लग्न
लग्नानंतरही पिता पिता चहा
सारखा पडतो एकच प्रश्न
नेहमी शेळीच का फोडते डरकाळी
अन् घाबरून का पळतो सिंह
देत देत किंकाळी?

पराक्रमी शेळी

एकदा सिंह उठला सकाळी
उठताच फोडली मोठ्याने डरकाळी
ऐकून डरकाळी वैतागली शेळी
एका फटक्यात सिंहाचाच घेतला बळी

हॅलोविन स्पेशल

रंगेबीरंगी मुखवटे
चित्रविचित्र पोशाख
चाॅकलेटची लयलूट
छोट्यांची सगळीकडे लुटपुट
धिप्पाड डायनोच्या आत व्यक्ती चिरकूट
अन् नाजूक बनी, जगदंबा 
बनून नाचते बेछूट
निरागस चिमुकली बनली रकून
म्हातारी चेटकीण चालत होती वाकून वाकून

श्वापदांचे मनोगत

गुराढोरांचा जीव सुखात
निवांत चरती गवत
हिंस्त्र श्वापद सदा दु:खात
अन्न त्याचे पळतं सतत

ताई

एक बाबा एक आई
सतत चाले त्यांची घाई घाई
लहान बाळ करते गाई गाई
शाळेत जाते मोठी ताई

चूकभूल

कधी प्यायला चहा
कधी प्यावी काॅफी
कधी खावे चाॅकलेट
कधी खावी टाॅफी
कधी झालीच चूक
तर मागावी लगेच माफी

ताकीद

एकदा बागेत चरत होता एक बकरा
ढेरपोट्या तिथेच बसून खात होता चहा नि खाकरा
खाता खाता दोघांनीही आजूबाजूस केला कचरा
तिकडून आला खाटीक, बकर्याची लावली व्यवस्था
ते बघताच, ढेरपोट्याची वाईट झाली अवस्था