Sunday, November 15, 2020

घरकोंबडा

ना गाडी ना टांगा
घरीच बसा करून वर ढांगा
उगाच कशाला घ्या करोनाशी पंगा
लागल्याआहेत आधीच दवाखान्याच्या बाहेर रांगा

Tuesday, June 09, 2020

मोर्चा

परीस्थिती होऊ घातलीय गंभीर
चार मित्रांना गोळा करणेही झाले आहे मुश्किल
चहा पिता पिता, करणार तरी किती चर्चा
चर्चेची वेळ गेली केव्हाच, काढायलाच हवा मोर्चा
#BlackLivesMatter

रकून

हसतो मी दात विचकून
चालतो मी वाकून वाकून
सगळेच बोलतात मला टाकून
मी तर आहे निर्मळ रकून
https://www.youtube.com/watch?v=bF78WAdzRjQ

Bear

मला मध देते का कोणी मध?
अरे मध देत का कोणी मध?
करोनापाई, मधमाश्या पण नाही फिरकत
पोळं बांधून, त्यांच कामही नाही उरकत
मध देते का कोणी मध? मध ...
पत्ता शोधत आलोय, कारण दुकानही आहेत बंद
मलातरी तुम्हास त्रास द्यायचा नाही काही छंद
मध देते का कोणी मध? मध ...
आधीच ईतका उकाडा, त्यातून वाढलेत केस
तहानलेला जीव माझा, मधामुळे कासावीस
मध मागण्यास आलोय ओलांडून मी जंगलाची वेस
मध देते का कोणी मध? मध ...
https://youtu.be/sPfF1ZUIrvE #BearVisit

महत्व

झोपडी असू दे कि महाल
सगळ्यात महत्वाची असते चूल
घरात मंडळी असतिल कितीही
सगळ्यात महत्त्वाचे असते तान्हे मूल
झाडाला लाख असतिल पाने, फांद्या आणी मूळ
पण सगळ्यांना आवडते ते फूल
करा लाईक, अन् वेळेच्या अपव्ययाबद्दल चूकभूल

साकडं

जमत नाही रोज रोज धावणं
जमतही नाही नुसतं उभं राहणं बनून बुजगावणं
वाढलेलं हाडावरलं मांस आता मुश्किल झालंय कातडीत मावणं
देवा तुच कर थोडा आमच्यावतीने व्यायाम, एवढंच आहे तुझ्याकडे मागणं

दिवास्वप्न

गरम चहाबरोबर बिस्किट मारी
सकाळी सकाळी उरकली मस्त न्याहारी
टळटळत्या उन्हात दुपारी
दिसला मला एक हत्ती भारी
पाठीवर त्याच्या होती भली मोठ्ठी अंबारी
मोठ्या अंबारीत ठेवली होती फक्त छोटीशी सुपारी
सुपारी कापता कापता, लागली होती डुलकी
दिवास्वप्नातली मजाच न्यारी
गम्मत जम्मत म्हणून हि चारोळी हलकीफूलकी

साश्वत / advice from the peanut gallery

साश्वत असे काय आहे?
नश्वर जीवन सारे
कितीही तोडलेस अकलेचे तारे
कालांतराने कोण कोणास विचारे?
निवांत बसूनी खा रे दाणे खारे
आजूबाजूची गंमत पहारे

चोचले

उलटं लटकलेलच खाणार आम्ही वटवाघूळ
भलतच काहीतरी खुळ
अंगात आमच्या आहेचमुळी चुळ
करोना चारतोय अख्या मानवजातीला धूळ #Covid-19

हाताचे वाक्यप्रचार

मी: “आज रविवार, मोकळा दिवसं आहे”. असं जाहीर करताच मला लक्षात आलं - “हात दाखवून अवलक्षण म्हणजे नक्की काय”.
ती : “अरे वा, बराच पसारा झाला आहे, तु आवरून टाक, पण भांडी घासून झाल्यावर”. असं म्हणून ती हात धूऊन माझ्या मागेच लागली.
मी : “अगं, सकाळपासून माझी पाठ दुखते आहे. मी हातावर पोट भरणारा माणूस आहे. थोडा आराम करायला हवा आहे”. असं म्हणून मी हात वर केले.
ती : “असं का? माझा हातखंडा आहे पाठदुखी बरी करण्यात. थांब मी तुला लाटण्यानेच पाठ चोळून देते”.
हातघाईच्या या परिस्थितीत, माझा हात दगडाखाली आला होता. तिचे अवसान बघून माझ्या लगेच लक्षात आले कि तिच्या हातावर तुरी देऊन काम टाळणे आता शक्यच नाही, माझ्या आळसाने तिच्यासमोर हात टेकले, आणी मी हात धऊन भांडी घासू लागलो. काम करता करता, माझी पाठदुखी देखील हात चोळीत, फारसी तसदी न देताच निघून गेली.

Sunday, May 03, 2020

करोनाचे दुष्परिणाम

थांबलेली वैश्विक वणवण
संभाषणांत सतत तांत्रिक अडचण
कुलूपबंदीमुळे आर्थिक चणचण
अती-जवळीकेने होणीरी कौटुंबिक तणतण
शैथिल्यामुळे शारिरीक कणकण
या सगळ्यांचा विचार केल्याने डोक्यात भणभण
#covid19

सुरवंट

तुडवायचे असेल रखरखित वाळवंट
हाकावेच लागतिल मनातले आळशी उंट
हाकता हाकता वाढलेजरी दाढिचे खुंट
चित्त, वृत्ती ठेवा चंट
कारण, फुलपाखरांसही मुक्त उडण्याआधी
भोगावेच लागते बनूनी संकुचित सुरवंट

#covid19

छंद

गुलाब गोळा करण्याचा आहे मला छंद
त्यापरी बोचतात मला सतत काटे
होतात कधी कधी भयंकर तोटे
तळीराम होतो मात्र शांत, चाखताच मुरलेला गुलकंद

नोकरदाराचा शुक्रवार

वेतन तर नेहमीच राहिल क्षुल्लक
त्यात काय उरणार शिल्लक?
चला चालवूया उसनी अक्कल
शोधूया एखादी नविन शक्कल
होऊया निवृत्त, पडण्याआधी टक्कल

शेंबडं प्रेम

रुमाल देऊन म्हणालीस, आधी नाक पूस
बघतां बघतां,
ह्रदयालाच पळवलेस माझ्या लाऊन फूस
वाट बघून बघून,
निद्रानाशाने बदलतोय मी सारखी कूस
रिकाम्या बरगड्या फोडतात टाहो
त्यांची तरी कर कि प्रेमाने विचारपूस

Saturday, March 28, 2020

व्यसनी संगत

व्यसनी संगत

तंबाखूला नाही चव
मळण्याशिवाय घालून चुना
सोमरसाची खरी मजा
जमतो जेव्हा मित्रगट जुना

Sunday, March 22, 2020

corona विषाणू

चवीने खातो प्रत्येक जिवाणू
अस्वच्छतेपायी जीवेभावे पाळतो किटाणू
जरी बनवलाय आम्ही परमाणू
तरी भारी पडतोय सध्या छोटासा विषाणू

corona

घरी बसून बसून आला जरी कंटाळा
तरी घरी बसूनच, नको ते संपर्क टाळा
वाटलच तर घरालाच लावा टाळा
कसेही करून त्या coronaला पिटाळा

#Covid19

Sunday, March 15, 2020

fling

Once upon a time
I had a fling
Nothing mattered, Fun was Everything
I can't find it anymore
Even if I searched it with Bing

Saturday, March 14, 2020

पाणीपुरी आणि covid

बघताच पाणीपुरी, तोंडाला सुटले पाणी
आठवताच covid चा संसर्ग, पळाले तोंडच पाणी
परिस्थिती सध्या आहे फारच बिकट, सगळीकडेच आणीबाणी
निर्हेतुक सामाजिक हितगुजदेखील ठरूशकेल जीवघेणी
बसावे घरी शांत, टाळण्यास संसर्ग
उत्तम हाच एक मार्ग

सोमरस

स्काॅच आणी सोडा
जोडीला चकणा थोडा
आनंदी स्वारी, पोहचली उत्तुंग शिखरी
दौडवताच कल्पनेचा घोडा

निर्धार

शत्रुंना पिटाळले मारुनी सोटे
रोखणारे हितचिंतक ठरले खोटे
निर्धाराने सोडले घरटे
पसरताच पंख आकाशहि पडले थिटे

चाय पे चर्चा

काॅफीमध्ये जायफळ अन चहामध्ये आलं
न बोलताच, कसं काय करणार ऐकमेकांच्या मनातलं?
विचारवंताना पडतात असले फुटकळ प्रश्न
अन् प्रेमी युगलं असतात त्याच्यातच मग्न!

Thursday, March 12, 2020

ती पहाट

रात्रभर जागरण, होऊ घातली पहाट
आगळाच होता अमुचा त्यावेळी थाट
चटकदार चहात घालून दमदार आलं
अन चहाच्या कपात वादळ चहातंच शमलं

ती रात्र

काॅफीमध्ये टाकताच जायफळ
गप्पा सुरू झाल्या वायफळ
अचानकच, खुशीत येऊन म्हटली ती
घे की मला जवळ
अजून काढणारेस कितीवेळ कळ?

Tom and Jerry

शेपटीला देताच जोरात पीळ
उंदिर शोधू लागला बीळ
मांजराने विचाकारले दात, उंदराची बसली दातखीळ
तेवढ्यात दिग्दर्शकाच्या कॅमर्याचं संपल रीळ

Tuesday, February 04, 2020

गायत्री

देवकृपेने जन्मलिस तू मुग्धापोटी
सगळ्यांनीच सांगितलं - आता खरी कसोटी
क्षणात विसरून बाहुली खोटी
ईराताईनेही स्वागतास तुझ्या, कसली कटी

तू बाळुंकी गुणी, झोपते पटकन लावताच वळकटी
तूझ्यासाठी हि चारोळी छोटी