Sunday, May 03, 2020

करोनाचे दुष्परिणाम

थांबलेली वैश्विक वणवण
संभाषणांत सतत तांत्रिक अडचण
कुलूपबंदीमुळे आर्थिक चणचण
अती-जवळीकेने होणीरी कौटुंबिक तणतण
शैथिल्यामुळे शारिरीक कणकण
या सगळ्यांचा विचार केल्याने डोक्यात भणभण
#covid19

सुरवंट

तुडवायचे असेल रखरखित वाळवंट
हाकावेच लागतिल मनातले आळशी उंट
हाकता हाकता वाढलेजरी दाढिचे खुंट
चित्त, वृत्ती ठेवा चंट
कारण, फुलपाखरांसही मुक्त उडण्याआधी
भोगावेच लागते बनूनी संकुचित सुरवंट

#covid19

छंद

गुलाब गोळा करण्याचा आहे मला छंद
त्यापरी बोचतात मला सतत काटे
होतात कधी कधी भयंकर तोटे
तळीराम होतो मात्र शांत, चाखताच मुरलेला गुलकंद

नोकरदाराचा शुक्रवार

वेतन तर नेहमीच राहिल क्षुल्लक
त्यात काय उरणार शिल्लक?
चला चालवूया उसनी अक्कल
शोधूया एखादी नविन शक्कल
होऊया निवृत्त, पडण्याआधी टक्कल

शेंबडं प्रेम

रुमाल देऊन म्हणालीस, आधी नाक पूस
बघतां बघतां,
ह्रदयालाच पळवलेस माझ्या लाऊन फूस
वाट बघून बघून,
निद्रानाशाने बदलतोय मी सारखी कूस
रिकाम्या बरगड्या फोडतात टाहो
त्यांची तरी कर कि प्रेमाने विचारपूस