Tuesday, June 09, 2020

हाताचे वाक्यप्रचार

मी: “आज रविवार, मोकळा दिवसं आहे”. असं जाहीर करताच मला लक्षात आलं - “हात दाखवून अवलक्षण म्हणजे नक्की काय”.
ती : “अरे वा, बराच पसारा झाला आहे, तु आवरून टाक, पण भांडी घासून झाल्यावर”. असं म्हणून ती हात धूऊन माझ्या मागेच लागली.
मी : “अगं, सकाळपासून माझी पाठ दुखते आहे. मी हातावर पोट भरणारा माणूस आहे. थोडा आराम करायला हवा आहे”. असं म्हणून मी हात वर केले.
ती : “असं का? माझा हातखंडा आहे पाठदुखी बरी करण्यात. थांब मी तुला लाटण्यानेच पाठ चोळून देते”.
हातघाईच्या या परिस्थितीत, माझा हात दगडाखाली आला होता. तिचे अवसान बघून माझ्या लगेच लक्षात आले कि तिच्या हातावर तुरी देऊन काम टाळणे आता शक्यच नाही, माझ्या आळसाने तिच्यासमोर हात टेकले, आणी मी हात धऊन भांडी घासू लागलो. काम करता करता, माझी पाठदुखी देखील हात चोळीत, फारसी तसदी न देताच निघून गेली.

No comments: