Tuesday, November 22, 2022

नागडा घोडा

disclaimer : 
Under the pretense of creative liberty; trying to spell the truth - 
Stay true to your nature!  
Unless you have a tail to save you from the shame of _NOT_ being yourself.
====================
टबडक टबडक धावला घोडा
फुलली छाती, लागली धाप
तोडांला सुटला फेस
लाज राखण्यास आहेतच की
झुपकेदार शेपटीचे केस
====================

Sunday, October 30, 2022

निवडणूकमुळे दंगल

निघाला एकदा मोठ्ठा मोर्चा, करीत गाजावाजा
पसरली गावात बातमी, गल्लीबोलीत चर्चाच चर्चा
चर्चा करता करता , झाले वादविवादअन थोडी टिंगल
क्षणात सुरू झाली मोट्ठी दंगल,पसरलं वातावरण अमंगल

Sunday, October 09, 2022

काल्पनिक

वास्तवात न भेटतां कधी
तु कल्पनेत माझ्या रुजलीच कशी?
भिरभीरीत नजर माझी शोधते तुला सतत
डोळे मिटताच दिसतेस कशी?

Friday, September 23, 2022

वाळीत

परदेशी व्यक्ती आलीच कशी आमच्या चाळीत
टाकावे का त्यास त्वरित वाळीत
आता अजून किती प्रसारण हा विषाणू
आम्ही सगळे याच काळजीत
सगळेच बसले हात चोळीत


ईरादे

जरूरते ना होगी कम
ख्वाईशे बढती रहे हरदम
चलते रहेंगे, चलेंग जबतक कदम
तानके रख्खे है सिना,
भलेहि दिलने तोडाहे दम
जालीम मुहोब्बत कर अब तो रहेम
मलदे खोखले हौसलो का मलम

Thursday, June 23, 2022

Corona विषाणू

=================================

चवीने खातो प्रत्येक जिवाणू
अस्वच्छतेपायी पाळतो जीवेभावे किटाणू
जरी बनवलाय आम्ही परमाणू
तरी भारी पडतोय सध्या छोटासा विषाणू

#COVID-19

गर्व

==================================

आम्ही मानव मारतो शिताफीने कित्येक किटाणू / जिवाणू 
गर्वाने फुगलाय आमच्यातला प्रत्येक अणूरेणू
आमच्यातल्यांना मारण्यास बनवलाय आम्ही बॉम्ब परमाणू
भारी पडलेच कसा छोटासा विषाणू ?
==================================

#Covid-19

मैत्री

तंबाखूला नाही चव
मळण्याशिवाय घालून चुना
सोमरसाची नाही मजा
नसल्यास गप्पा मारण्यास मित्र जुना




Wednesday, February 02, 2022

जोडगळीची अडगळ

खुशाल ख्या माझी झडती 
लपवण्यास माझ्याकडे न काही 
माझ्या शब्दास नको दुसराची ग्वाही 
सप्तपदीनंतर सगळेच पोळलो, 
अजूनही होते लाही लाही 
वाचणाऱ्यास वाटे, लिहितो काहीबाही 
भोगण्याराला वाटे संपेल कधी साडेसाती

दु:खावलेला रोमियो

ऐ दुनिया मत कर एहसान
मै तो हूही एहसान फरामोश
हरकदम करता हू दिले ईश्क खामोश
वजूद तो अब खोहि दिया
बस मौत को कर दे ना आसान