Saturday, December 30, 2023

बंडूला पडलेला प्रश्न …

बंडूला पडलेला प्रश्न … 

lungs 🫁 छाती मध्ये असतात तर लुंगी कमरेवर का नेसतात?

झिंप्याच उत्तर

त्याचं शास्त्रिय कारण असं आहे … 

लुंगी कमरेवर लिंग झाकण्यासाठी नेसतात … 😂

वाफळणारा चहा

1. फेसाळणार्या लांटावर स्वार होऊन अटकेपार झेंडे गाडण्याची जिद्द जो जागवतो - तो. म्हणजे वाफळणारा चहा. 

2. ज्वलंत ज्वालामुखीबरोबर राहूनहि प्रशांत सागरापरी स्थितप्रद्यनता अंगी भिनवतो तो देखील वाफाळणारा चहा

3. कडवट कॅाफिने कडवटलेली चव आणी वखवखलेली वृत्ती क्षणात शांत करून निखळ मैत्री प्रस्थापित करतो तो सुध्दा वाफळणारा चहा

Saturday, December 16, 2023

दिलजले

 

हा है हम दिल जले

चाहे कितना भी झिडकलो नमक जले पे

चिंगारी उठेगी, चार सालोंमे बनेगी ज्वाला

अगला चषक हमारा, है पुरा हौसला

घटस्फोट


लाज सोडल्यावर का धरावे फडके 

एक घाव, दोन तुकडे 

तू तिकडे मी ईकडे 

गगनात आनंद चोहिकडे

Monday, November 06, 2023

ब्रा म्हण

 ती : अहो, अ..हो …., अहो, ईकडे या लवकर
तो :  काय.. आलो आलो.  झालंय काय?
तीः शाळेतून फोन आला होता, चिंटू आपला दिवे लावतो आहे शाळेत.  त्याला विचारलं तर म्हणे बाबांनीच सांगितलं आहे.  

तो: मी? मी कुठे काय सांगितलं. झालंय तरी काय?

ती: अहो .. तो सारखा ब्रा ब्रा करतो आहे. कसं वाटत. नविन बाई आल्या शाळेत .. त्यांनी विचारल तु कोण आहेस.  तर हा आपला .. ब्रा 

तो: हं? 

ती: तेच तर 

तो: विचार करतं  .. मी सांगितलं? मी तर काहिच म्हटले नाही.  चिंटू  .. ऐ चिंटू .. चिंट्या .. ईकडे
ये लवकर 

ती: अहो .. रागवू नका त्याला .. 

तो: अरे रागवू नको? संस्कार करतो आपण … ब्राम्हणाचं पोर आहे .. वात्रटचाळे करतो म्हणजे काय. चिंट्या .. ईकडे ये. 

ती: जाऊ द्या हो, मी सांगेन समजावून

तो: चिंट्या तू शाळेत काय ब्रा ब्रा म्हणत फिरतोस? 
चिंटू : बाबा .. तुम्हीच म्हणाता ना नेहमी ?
तो: मी .. मी म्हणतो? अरे तुझ्या ऐवढं आम्ही होतो .. शाळेत ब्रा काय.. तोंडातून ब्र काढायची पण हिंमत नव्हती 
ती: (हळूच … टोमणा) आणी एवढे मोठे आहात पण ब्र काय ब्रा पण काढता येत नाही यांना… मी आहे म्हणून 

तो: ऐ ..( ओशाळून) काय चाल्लय .. ते सवय नाही म्हणून .. चिंटू .. तू सांग .. शाळेत तू काब्र .. i mean का   ब   र   हां.. का बर ब्रा ब्रा म्हणत होतास?

चिंटू : बाबा .. तूम्हीतर म्हणत होता ना .. संध्या काळी संध्या कर ब्राम्हण आहेस तू ब्रा म्हण।।।
म्हणून मी शाळेत म्हटलं ब्रा ब्रा .. तूम्हीच सांगितलय ना .. ब्रा म्हण ब्रा म्हण. म्हणून मी म्हणलो ब्रा

Tuesday, October 24, 2023

तुझ्यासाठी

तो: तु कोण आहेस? तु ना … तु हवा आहेस … नाही नाही, म्हणजे तु ना मला हवी आहेस?

ती : मी हवा आहे?

तो : नाही .. तु हवी आहेस …

ती : काय … मी , मी हवी आहेस? कुणाला .. तुला

तो : तत् पप् .. घाबरत .. म्हणजे तू हवा आहेस .. i mean  तू हवे सारखी आहेस ..माझ्या साठी .. म्हणून मला हवी आहेस .. 

ती : डोळे वटारून … काय मी हवे सारखी आहे ? हवा कि हवी आहे?

तो : (अजून घाबरत घाबरत … ) दोन्ही दोन्ही ..

ती : म्हणजे… नीट सांग .. हवा कि हवी .. 

तो : म्हणजे … तु ना … तु ना .. हवा आहेसं.  

ती : काय .. ?

तो : म्हणजे .. तू ना नुसती असतेस … म्हणजे आहेस .. सगळीकडे, माझ्या विचारात, अवती भोवती .. पण दिसतंच नाहिस ना 

ती : म्हणजे मी हवा आहे 

तो : अमं हं .. हो हो .. नाही .. म्हणजे हो .. हवी आहे 

ती :  नाही? म्हणजे हो ? हो की नाही .. 

तो : नाही नाही, तसं नाही .. म्हणजे हो .. 

ती : काय? हो म्हणजे नाही???

तो : ना..ही .. तसं नाही .. म्हणजे तू हवा आहेस आणी हवी आहेस .. हं हो .. हा , हो हे बरोबर आहे. 

ती : काय बरोबर आहे 

तो : तू बरोबर आहेस हे बरोबर आहे 

ती :  अरे काय बरोबर आहे? 

तो: तू हवा आहेस. नाही तू हवी आहेस

ती : मी हवी आहे???

तो: म्हणजे — तु हवेसारखी आहेस.. आणी म्हणून मला हवी आहेस .. हे बरोबर आहे

ती :  आत्ता कळलं .. हा .. हो रे माझ्या राजा 

तो: हो … 

ती :  आणी तू बरोबर आहेस .. हेच बरोबर आहे .. चूक.. चूकत असेल तरीही.. 

तो: चूक नाही .. अचूक हेरलंयस तू मला …

ती : humm

तो:  हवेसारखीच असतेस तू माझ्या बरोबर … सतत .. दिसली नाहीस तरी … जाणाऱ्या क्षणातून प्रत्येक श्वासापरी येणाऱ्या क्षणात खेचून आणतेस .. तू मला 

ती: बर बरं. आता जास्त फुगवू नकोस .. आणी फुगू पण नकोस .. नाही तर भ्रमाचा भोपळा फुटेल … आणी जागा झाला कि म्हणशील तू ना .. तू ना .. रक्त आहेस …. सतत माझ्या ह्रुदयात असते म्हणून.

Monday, October 23, 2023

Absent

असा घडला काय हातून गुन्हा ?
 ज्याची शिक्षा पुन्हा पुन्हा 
 सहवासाचा ना त्या पडला कधी विसर 
 सहवासात आता मीच नसतो हजर

Saturday, October 21, 2023

संस्कार

 

गुरुजी - संस्कारांना फार महत्वं आहे.  

बंड्या - तू सांग बरं समजावून.  

बंड्या - (गंभीरतेने विचार करून) गुरुजी उदाहरण देऊन सांगितलं तर चालेल का, सांगायला सोप्पं जाईल. 

गुरुजी - अरे चालेल काय? पळेल पळेल.  सांगायला काय पण समजायला पण सोपं जाईल. सांग बघू तुझं उदाहरण संस्काराबद्दल

बंड्या - (घसा सफ करत) - हे पहा, केळ नैसर्गिक रित्या चांगलंच असतं, पण त्यात कितीही गुणधर्म असले तरी ते ना फार काळ टिकत, ना ते लोकांना फार काही आवडंत. आवडीच तर सोडा , बऱ्याच लोकांची कुरकुर असते - हे केळ फारच कच्चं आहे , तर कधी खुप जास्तं झालं आहे .. 

गुरुजी — अरे वाहवत जाऊ नकोस, मुद्याचं सांग कि  .. पण तु म्हणतोय ते बरोबरच आहे. 

बंड्या — सांगतो सांगतो .. तर आता आपण यांच केळ्यावर विविध संस्कार करुन त्याचे काप केले, तळले .. म्हणजे थोडक्यात सांगायचे म्हणजे banana chips केले कि — त्यातले जरी मुळचे सगळे गुणधर्म नाहीये झाले तरी ते सगळ्यांना आवडतात, ते जरी दीर्घ काळ टिकत असले तरी फडताळात मात्र फार काळ टिकत नाही.  

संस्काराचा फायदा तो हाच.

मळ्यापर्यंत मॅरेथान

==============

बंड्या : ऐ झिंप्या, ते मॅरेथॉन म्हणजे काय रे ? आजकाल सारखं मी काही ना काही एकतो .. अमक्याच्या तमक्याने अमूक तमुक मॅरेथॉन धावली.  

झिंप्या : मॅरेथॉन म्हणजे .. धावायचं रे फक्त ?

बंड्या : धावायच … ?

झिंप्या : हो 

बंड्या : अरे पण धावयचं म्हणजे नक्की काय? कुठून कुठे धावायचं ?

झिंप्या : अरे धावायचं फक्त .. कुठनहि कुठे

बंड्या : अरे च्या मारी काय पण भलतच .. आणी कोणी धावायचं …?

झिंप्या : कुणी पण धाऊ शकतं … 

बंड्या :  कुणी पण …? 

झिंप्या :  हो , हो कुणी पण ..

बंड्या :  कुणी पण 

झिंप्या : हो तर, माणूस म्हणू नको , बाईमाणूस म्हणू नको .. 

बंड्या : बाईमाणूस पण घावत्यात

झिंप्या : अरे मग काय, काही काही बायका माणसापेक्षा जोरात धावतात .. तर सांगायच म्हणजे काय, बाई म्हणू नको, माणूस म्हणू नको, लहान मोठं, म्हातारं कोतारं .. सगळी धावत्यात बघ मॅरेथॉन. 

बंड्या : अन् कुठून कुठबी धावयचं , म्हणजे ईथनं मळ्यापर्यंत धावलो तर झाली का मॅरेथॉन?

झिंप्या : अरं तसं नाही .. २६ मैल तरी पाहिजे बुवा , ईथनं मळ्यापर्यंत १३-१४ मैल असेल, म्हणजे .. 

बंड्या : हा म्हणजे , ईथनं जायचं मळयापर्यंत , मागल्या पावलीच परत इथपर्यंत यायचं…

झिंप्या : हा बरोबर .. पण धावत

बंड्या :  धावत व्हयं 

झिंप्या : हो धावत 

बंड्या : अनं तु काय म्हनला मगाशी .. कुनीपण धावले तर चालतय.. 

झिंप्या : अरे चालतय काय, पलतय पलतय .. हा … मॅरेथॉन म्हणजे धावयचं … २६ मैल

बंड्या : जमतय कि मग 

झिंप्या : कुणाला ..तुला ?

बंड्या : हो तूच म्हणाला नं कुणी बी धावलो तर चालतय

झिंप्या : हो , पण तयारी करावी लागते 

बंड्या : मला नाही लागत 

झिंप्या : असं नाही बंड्या .. लागते तयारी , नाही तर .. नुसतीच लागते .. ला .. ग .. ते … वाट

बंड्या : नाही लागत  .. मीनं आधीच तयारी केली हाय, तु म्हनला नं कुनी बी धावलो तर चालतय .. बघ तू .. लाव पैज.. मळ्यापर्यंत मॅरेथान

झिंप्या : लावली पैज

बंड्या : बघ हा .. नंतर म्हणशील पैका नंतर देतो.. 

झिंप्या : अरे तू करून तर दाव ना मले आधी

बंड्या : बसंती … आ बसंती .. 

(बंड्याची घोडी धावत येते , बंड्या घौडेदौड करत मळ्यापर्यंत जाऊन परत येतो )

बंड्या : ए झिंप्या , काढ पैकं .. धावलो कि नाही मॅरेथान … 

झिंप्या : अरे तु कुठे धावला .. बसंती धावली, तु नुसताच बसला बसंती वर .. याले नाही म्हणत मॅरेथान

बंड्या : अरे पन तुच म्हणाला ना .. आता पलटी मारतोस.. 

झिंप्या : मी काय म्हणलो 

बंड्या : कुनी पण धावलो तर चालतय .. माजी बसंती  धावली ना … पुर्नं २६ मैल … काढ पैकं

Tuesday, June 13, 2023

दिनचर्या

दिनचर्या
========================
आपल्या दिवसांचे आपणच चालवावे शासन
रोज करावे स्नान , हे तेर सगळ्यात आसान
जोडीला करावे आसन ,सुदृढ राहील शरीराबरोबर मन
जेवणयाऐवजी करावे आचमन, विष्ठेचे करावे नियमित गमन
डोक्याला लावावे तेल, नाही तर आहेच उजडा चमन
ध्यानी ठेवून क्षणभंगूर जीवन , करावे सतत हरी नमन

Monday, March 27, 2023

बंदिस्त < पडले उलटे दान>

क्यो क्यु  [कौन] कहता है समय रुकता नही 

क्या कभी किसी ने रोकने कि कोशिश कि है 

तुम साथ होती हो तो पता नाही अपने आप हि रुक जाता है

तुम जाती हो , तो पता नही कहा भाग जाता है वो 


 ----

 


Saturday, March 25, 2023

चारोळी

प्रत्येक वेळी मांडण्यासारखे विचार असतातच असे नाही 
आणि लिहायचे असले तरी चारोळी सुचलेच असेही नाही 
पण जिथे प्रयत्ने वाळूचे कण रगडता तेलही गळे 
तिथे शब्दाने शब्द जुळवित चारोळीही मिळे 

Sunday, February 19, 2023

चारू

=======

माझी मैत्रिण चारू

नावावरून वाटे पापभिरू 

मागतसे पिण्यास फक्त दारू 

दारूनंतर म्हणे एक तरी बिडी मारू 

तलफ

 अहाहा चहाची तलफ भारी

चहा बरोबर खावी खारी

नाही तर बिस्किट मारी

दोस्तांना चहाच तारी 

कट्ट्यावरच्या कटिंगची गम्मत न्यारी

Monday, February 13, 2023

रिकामटेकडा रोमियो

तुझ्यासाठी खरडली कित्येक पाने
विचारांचे थैमान, त्यात भावनिक आंदोलने
स्पर्शात आसुसलेला मी, शमेल कसा नुसत्या विचाराने
कवेत ये लवकर,कंटाळलो भरून दिवसांचे रिकामे रकाने

यादे

गुजरते वक्त के साथ याददाश्त जाने लगी
न जाने फिरभी क्यो तुम बार बार याद आते हो
शायद मे ही तुम्ह भूल जाती हू ईसलिये याद आते हो
काश, मै तुम्हे ना भुलतां कभी
ना होता शिकवा याद आने का
जो भूल गये ईसिलेये याद आऐ
साथ रहते तो आबाद होते

जीवनामृत

रात्रीस खेळ चाले
कित्येक आले गेले
घुसवता छातीत भाले
काही जगले, काही मेले
बरेच न जगताच मेले

Friday, January 06, 2023

दहावीचे वर्ष

भौतिकशास्त्र , जीवशास्त्र , रसायनशास्त्र
शाळेच्या पहिल्यादिवशीच गलीगात्र
तिकडून आले गुरुजी
म्हणे, ते सोडा,
चला अभ्यासू बीजगणित भूमिती
टणक मेंदूत, गणिताचं पेरलच गेलं नव्हतं बीज
वर मानगुटीवर बसली भूमितीची भिती
तेवढ्यात आल्या नविन शिक्षिका
म्हणे, ते सोडा
ई. भू. ना. है बहोतही आसान
हिंदी ऐकताच, गळून पडले उसने अवसान
ईतकं झाल्यावर आल्या मुख्याध्यापिका
म्हणे, ते सोडा
चला शिकूया विविध भाषा - ईंग्रजी, संस्कृत, हिंदी, आणि मराठी
येव्हानाशी मेंदूला पण पडल्या गाठी
त्यातून शिक्षकांच्या कपाळावरली आठी
म्हटल गुंडाळावा का गाशा
पण बुध्दी ईतकिही नव्हती नाठी
म्हटलं आरामात करू दहावी, येईपर्यत साठी
कसा बसा उरकला अभ्यास
त्या वर्षी, दहावीच्या परीक्षेचाच होता सतत ध्यास