Friday, January 06, 2023

दहावीचे वर्ष

भौतिकशास्त्र , जीवशास्त्र , रसायनशास्त्र
शाळेच्या पहिल्यादिवशीच गलीगात्र
तिकडून आले गुरुजी
म्हणे, ते सोडा,
चला अभ्यासू बीजगणित भूमिती
टणक मेंदूत, गणिताचं पेरलच गेलं नव्हतं बीज
वर मानगुटीवर बसली भूमितीची भिती
तेवढ्यात आल्या नविन शिक्षिका
म्हणे, ते सोडा
ई. भू. ना. है बहोतही आसान
हिंदी ऐकताच, गळून पडले उसने अवसान
ईतकं झाल्यावर आल्या मुख्याध्यापिका
म्हणे, ते सोडा
चला शिकूया विविध भाषा - ईंग्रजी, संस्कृत, हिंदी, आणि मराठी
येव्हानाशी मेंदूला पण पडल्या गाठी
त्यातून शिक्षकांच्या कपाळावरली आठी
म्हटल गुंडाळावा का गाशा
पण बुध्दी ईतकिही नव्हती नाठी
म्हटलं आरामात करू दहावी, येईपर्यत साठी
कसा बसा उरकला अभ्यास
त्या वर्षी, दहावीच्या परीक्षेचाच होता सतत ध्यास