Tuesday, October 24, 2023

तुझ्यासाठी

तो: तु कोण आहेस? तु ना … तु हवा आहेस … नाही नाही, म्हणजे तु ना मला हवी आहेस?

ती : मी हवा आहे?

तो : नाही .. तु हवी आहेस …

ती : काय … मी , मी हवी आहेस? कुणाला .. तुला

तो : तत् पप् .. घाबरत .. म्हणजे तू हवा आहेस .. i mean  तू हवे सारखी आहेस ..माझ्या साठी .. म्हणून मला हवी आहेस .. 

ती : डोळे वटारून … काय मी हवे सारखी आहे ? हवा कि हवी आहे?

तो : (अजून घाबरत घाबरत … ) दोन्ही दोन्ही ..

ती : म्हणजे… नीट सांग .. हवा कि हवी .. 

तो : म्हणजे … तु ना … तु ना .. हवा आहेसं.  

ती : काय .. ?

तो : म्हणजे .. तू ना नुसती असतेस … म्हणजे आहेस .. सगळीकडे, माझ्या विचारात, अवती भोवती .. पण दिसतंच नाहिस ना 

ती : म्हणजे मी हवा आहे 

तो : अमं हं .. हो हो .. नाही .. म्हणजे हो .. हवी आहे 

ती :  नाही? म्हणजे हो ? हो की नाही .. 

तो : नाही नाही, तसं नाही .. म्हणजे हो .. 

ती : काय? हो म्हणजे नाही???

तो : ना..ही .. तसं नाही .. म्हणजे तू हवा आहेस आणी हवी आहेस .. हं हो .. हा , हो हे बरोबर आहे. 

ती : काय बरोबर आहे 

तो : तू बरोबर आहेस हे बरोबर आहे 

ती :  अरे काय बरोबर आहे? 

तो: तू हवा आहेस. नाही तू हवी आहेस

ती : मी हवी आहे???

तो: म्हणजे — तु हवेसारखी आहेस.. आणी म्हणून मला हवी आहेस .. हे बरोबर आहे

ती :  आत्ता कळलं .. हा .. हो रे माझ्या राजा 

तो: हो … 

ती :  आणी तू बरोबर आहेस .. हेच बरोबर आहे .. चूक.. चूकत असेल तरीही.. 

तो: चूक नाही .. अचूक हेरलंयस तू मला …

ती : humm

तो:  हवेसारखीच असतेस तू माझ्या बरोबर … सतत .. दिसली नाहीस तरी … जाणाऱ्या क्षणातून प्रत्येक श्वासापरी येणाऱ्या क्षणात खेचून आणतेस .. तू मला 

ती: बर बरं. आता जास्त फुगवू नकोस .. आणी फुगू पण नकोस .. नाही तर भ्रमाचा भोपळा फुटेल … आणी जागा झाला कि म्हणशील तू ना .. तू ना .. रक्त आहेस …. सतत माझ्या ह्रुदयात असते म्हणून.

Monday, October 23, 2023

Absent

असा घडला काय हातून गुन्हा ?
 ज्याची शिक्षा पुन्हा पुन्हा 
 सहवासाचा ना त्या पडला कधी विसर 
 सहवासात आता मीच नसतो हजर

Saturday, October 21, 2023

संस्कार

 

गुरुजी - संस्कारांना फार महत्वं आहे.  

बंड्या - तू सांग बरं समजावून.  

बंड्या - (गंभीरतेने विचार करून) गुरुजी उदाहरण देऊन सांगितलं तर चालेल का, सांगायला सोप्पं जाईल. 

गुरुजी - अरे चालेल काय? पळेल पळेल.  सांगायला काय पण समजायला पण सोपं जाईल. सांग बघू तुझं उदाहरण संस्काराबद्दल

बंड्या - (घसा सफ करत) - हे पहा, केळ नैसर्गिक रित्या चांगलंच असतं, पण त्यात कितीही गुणधर्म असले तरी ते ना फार काळ टिकत, ना ते लोकांना फार काही आवडंत. आवडीच तर सोडा , बऱ्याच लोकांची कुरकुर असते - हे केळ फारच कच्चं आहे , तर कधी खुप जास्तं झालं आहे .. 

गुरुजी — अरे वाहवत जाऊ नकोस, मुद्याचं सांग कि  .. पण तु म्हणतोय ते बरोबरच आहे. 

बंड्या — सांगतो सांगतो .. तर आता आपण यांच केळ्यावर विविध संस्कार करुन त्याचे काप केले, तळले .. म्हणजे थोडक्यात सांगायचे म्हणजे banana chips केले कि — त्यातले जरी मुळचे सगळे गुणधर्म नाहीये झाले तरी ते सगळ्यांना आवडतात, ते जरी दीर्घ काळ टिकत असले तरी फडताळात मात्र फार काळ टिकत नाही.  

संस्काराचा फायदा तो हाच.

मळ्यापर्यंत मॅरेथान

==============

बंड्या : ऐ झिंप्या, ते मॅरेथॉन म्हणजे काय रे ? आजकाल सारखं मी काही ना काही एकतो .. अमक्याच्या तमक्याने अमूक तमुक मॅरेथॉन धावली.  

झिंप्या : मॅरेथॉन म्हणजे .. धावायचं रे फक्त ?

बंड्या : धावायच … ?

झिंप्या : हो 

बंड्या : अरे पण धावयचं म्हणजे नक्की काय? कुठून कुठे धावायचं ?

झिंप्या : अरे धावायचं फक्त .. कुठनहि कुठे

बंड्या : अरे च्या मारी काय पण भलतच .. आणी कोणी धावायचं …?

झिंप्या : कुणी पण धाऊ शकतं … 

बंड्या :  कुणी पण …? 

झिंप्या :  हो , हो कुणी पण ..

बंड्या :  कुणी पण 

झिंप्या : हो तर, माणूस म्हणू नको , बाईमाणूस म्हणू नको .. 

बंड्या : बाईमाणूस पण घावत्यात

झिंप्या : अरे मग काय, काही काही बायका माणसापेक्षा जोरात धावतात .. तर सांगायच म्हणजे काय, बाई म्हणू नको, माणूस म्हणू नको, लहान मोठं, म्हातारं कोतारं .. सगळी धावत्यात बघ मॅरेथॉन. 

बंड्या : अन् कुठून कुठबी धावयचं , म्हणजे ईथनं मळ्यापर्यंत धावलो तर झाली का मॅरेथॉन?

झिंप्या : अरं तसं नाही .. २६ मैल तरी पाहिजे बुवा , ईथनं मळ्यापर्यंत १३-१४ मैल असेल, म्हणजे .. 

बंड्या : हा म्हणजे , ईथनं जायचं मळयापर्यंत , मागल्या पावलीच परत इथपर्यंत यायचं…

झिंप्या : हा बरोबर .. पण धावत

बंड्या :  धावत व्हयं 

झिंप्या : हो धावत 

बंड्या : अनं तु काय म्हनला मगाशी .. कुनीपण धावले तर चालतय.. 

झिंप्या : अरे चालतय काय, पलतय पलतय .. हा … मॅरेथॉन म्हणजे धावयचं … २६ मैल

बंड्या : जमतय कि मग 

झिंप्या : कुणाला ..तुला ?

बंड्या : हो तूच म्हणाला नं कुणी बी धावलो तर चालतय

झिंप्या : हो , पण तयारी करावी लागते 

बंड्या : मला नाही लागत 

झिंप्या : असं नाही बंड्या .. लागते तयारी , नाही तर .. नुसतीच लागते .. ला .. ग .. ते … वाट

बंड्या : नाही लागत  .. मीनं आधीच तयारी केली हाय, तु म्हनला नं कुनी बी धावलो तर चालतय .. बघ तू .. लाव पैज.. मळ्यापर्यंत मॅरेथान

झिंप्या : लावली पैज

बंड्या : बघ हा .. नंतर म्हणशील पैका नंतर देतो.. 

झिंप्या : अरे तू करून तर दाव ना मले आधी

बंड्या : बसंती … आ बसंती .. 

(बंड्याची घोडी धावत येते , बंड्या घौडेदौड करत मळ्यापर्यंत जाऊन परत येतो )

बंड्या : ए झिंप्या , काढ पैकं .. धावलो कि नाही मॅरेथान … 

झिंप्या : अरे तु कुठे धावला .. बसंती धावली, तु नुसताच बसला बसंती वर .. याले नाही म्हणत मॅरेथान

बंड्या : अरे पन तुच म्हणाला ना .. आता पलटी मारतोस.. 

झिंप्या : मी काय म्हणलो 

बंड्या : कुनी पण धावलो तर चालतय .. माजी बसंती  धावली ना … पुर्नं २६ मैल … काढ पैकं