गुरुजी - संस्कारांना फार महत्वं आहे.
बंड्या - तू सांग बरं समजावून.
बंड्या - (गंभीरतेने विचार करून) गुरुजी उदाहरण देऊन सांगितलं तर चालेल का, सांगायला सोप्पं जाईल.
गुरुजी - अरे चालेल काय? पळेल पळेल. सांगायला काय पण समजायला पण सोपं जाईल. सांग बघू तुझं उदाहरण संस्काराबद्दल
बंड्या - (घसा सफ करत) - हे पहा, केळ नैसर्गिक रित्या चांगलंच असतं, पण त्यात कितीही गुणधर्म असले तरी ते ना फार काळ टिकत, ना ते लोकांना फार काही आवडंत. आवडीच तर सोडा , बऱ्याच लोकांची कुरकुर असते - हे केळ फारच कच्चं आहे , तर कधी खुप जास्तं झालं आहे ..
गुरुजी — अरे वाहवत जाऊ नकोस, मुद्याचं सांग कि .. पण तु म्हणतोय ते बरोबरच आहे.
बंड्या — सांगतो सांगतो .. तर आता आपण यांच केळ्यावर विविध संस्कार करुन त्याचे काप केले, तळले .. म्हणजे थोडक्यात सांगायचे म्हणजे banana chips केले कि — त्यातले जरी मुळचे सगळे गुणधर्म नाहीये झाले तरी ते सगळ्यांना आवडतात, ते जरी दीर्घ काळ टिकत असले तरी फडताळात मात्र फार काळ टिकत नाही.
संस्काराचा फायदा तो हाच.
No comments:
Post a Comment