Tuesday, October 24, 2023

तुझ्यासाठी

तो: तु कोण आहेस? तु ना … तु हवा आहेस … नाही नाही, म्हणजे तु ना मला हवी आहेस?

ती : मी हवा आहे?

तो : नाही .. तु हवी आहेस …

ती : काय … मी , मी हवी आहेस? कुणाला .. तुला

तो : तत् पप् .. घाबरत .. म्हणजे तू हवा आहेस .. i mean  तू हवे सारखी आहेस ..माझ्या साठी .. म्हणून मला हवी आहेस .. 

ती : डोळे वटारून … काय मी हवे सारखी आहे ? हवा कि हवी आहे?

तो : (अजून घाबरत घाबरत … ) दोन्ही दोन्ही ..

ती : म्हणजे… नीट सांग .. हवा कि हवी .. 

तो : म्हणजे … तु ना … तु ना .. हवा आहेसं.  

ती : काय .. ?

तो : म्हणजे .. तू ना नुसती असतेस … म्हणजे आहेस .. सगळीकडे, माझ्या विचारात, अवती भोवती .. पण दिसतंच नाहिस ना 

ती : म्हणजे मी हवा आहे 

तो : अमं हं .. हो हो .. नाही .. म्हणजे हो .. हवी आहे 

ती :  नाही? म्हणजे हो ? हो की नाही .. 

तो : नाही नाही, तसं नाही .. म्हणजे हो .. 

ती : काय? हो म्हणजे नाही???

तो : ना..ही .. तसं नाही .. म्हणजे तू हवा आहेस आणी हवी आहेस .. हं हो .. हा , हो हे बरोबर आहे. 

ती : काय बरोबर आहे 

तो : तू बरोबर आहेस हे बरोबर आहे 

ती :  अरे काय बरोबर आहे? 

तो: तू हवा आहेस. नाही तू हवी आहेस

ती : मी हवी आहे???

तो: म्हणजे — तु हवेसारखी आहेस.. आणी म्हणून मला हवी आहेस .. हे बरोबर आहे

ती :  आत्ता कळलं .. हा .. हो रे माझ्या राजा 

तो: हो … 

ती :  आणी तू बरोबर आहेस .. हेच बरोबर आहे .. चूक.. चूकत असेल तरीही.. 

तो: चूक नाही .. अचूक हेरलंयस तू मला …

ती : humm

तो:  हवेसारखीच असतेस तू माझ्या बरोबर … सतत .. दिसली नाहीस तरी … जाणाऱ्या क्षणातून प्रत्येक श्वासापरी येणाऱ्या क्षणात खेचून आणतेस .. तू मला 

ती: बर बरं. आता जास्त फुगवू नकोस .. आणी फुगू पण नकोस .. नाही तर भ्रमाचा भोपळा फुटेल … आणी जागा झाला कि म्हणशील तू ना .. तू ना .. रक्त आहेस …. सतत माझ्या ह्रुदयात असते म्हणून.

No comments: