तो : काय.. आलो आलो. झालंय काय?
तीः शाळेतून फोन आला होता, चिंटू आपला दिवे लावतो आहे शाळेत. त्याला विचारलं तर म्हणे बाबांनीच सांगितलं आहे.
तो: मी? मी कुठे काय सांगितलं. झालंय तरी काय?
ती: अहो .. तो सारखा ब्रा ब्रा करतो आहे. कसं वाटत. नविन बाई आल्या शाळेत .. त्यांनी विचारल तु कोण आहेस. तर हा आपला .. ब्रा
तो: हं?
ती: तेच तर
तो: विचार करतं .. मी सांगितलं? मी तर काहिच म्हटले नाही. चिंटू .. ऐ चिंटू .. चिंट्या .. ईकडे
ये लवकर
ती: अहो .. रागवू नका त्याला ..
तो: अरे रागवू नको? संस्कार करतो आपण … ब्राम्हणाचं पोर आहे .. वात्रटचाळे करतो म्हणजे काय. चिंट्या .. ईकडे ये.
ती: जाऊ द्या हो, मी सांगेन समजावून
तो: चिंट्या तू शाळेत काय ब्रा ब्रा म्हणत फिरतोस?
चिंटू : बाबा .. तुम्हीच म्हणाता ना नेहमी ?
तो: मी .. मी म्हणतो? अरे तुझ्या ऐवढं आम्ही होतो .. शाळेत ब्रा काय.. तोंडातून ब्र काढायची पण हिंमत नव्हती
ती: (हळूच … टोमणा) आणी एवढे मोठे आहात पण ब्र काय ब्रा पण काढता येत नाही यांना… मी आहे म्हणून
तो: ऐ ..( ओशाळून) काय चाल्लय .. ते सवय नाही म्हणून .. चिंटू .. तू सांग .. शाळेत तू काब्र .. i mean का ब र हां.. का बर ब्रा ब्रा म्हणत होतास?
चिंटू : बाबा .. तूम्हीतर म्हणत होता ना .. संध्या काळी संध्या कर ब्राम्हण आहेस तू ब्रा म्हण।।।
म्हणून मी शाळेत म्हटलं ब्रा ब्रा .. तूम्हीच सांगितलय ना .. ब्रा म्हण ब्रा म्हण. म्हणून मी म्हणलो ब्रा