Monday, February 19, 2024

दिलफेक रोमियो

फार सोपं झालं असतं 

आपल्यातलं प्रेम  शब्दातच कैद करता आलं असतं तर

अफाट, अमर्याद, अविरत, अटकेपार, अतुट, अतिशय, अशक्य…

या प्रेमाला शब्दांमध्ये गुंफू तरी कसं?

जे सांगायचं आहे ते तुझ्यापर्यंत पोहचवू तरी कसं?

न बोलताच तुला समजतं सगळं, तर मग बोलू तरी काय नी कसं?

स्पर्शानेच जे समजू शकेल ते digitization द्वारे शमवू कसं ? 

तुच पहा एखादं गुलाबाचं फूल, अन् त्यावरंचा भुंगा

कळेलच तुला माझ्याच मनात मी घालतो किती दंगा 

Saturday, February 17, 2024

बेवडा Teatotaller

 

========================

गण्याः (पिता पिता) .. बंड्या, ऐ बंड्या .. teatotaller म्हणजे काय रे?

बंड्याः teatotaller म्हणजे .. आपलं हे रे 

गण्याः आपलं हे !!!

बंड्याः (विचार करून) अरे जो घरातला सगळा चहा टोटली संपवतो तो टिटोटलर (teatotaller )

गण्याः भारीच न रे , ईंग्रजी चांगलच आहे तुझं 

बंड्याः आहे काय नाही काय .. शब्दातच त्या शब्दांचा अर्थ दडलेला असतो 

गण्याः म्हणजे ..

बंड्याः (घोट घेत घेत) बेवडा म्हणजे काय

सांग बरं ?

गण्याः बेवडा म्हणजे … बे व डा ( action करतो)

बंड्याः साफ चूक, बेवडा म्हणजे जो नेहमी दोन वडा प्लेट मागवतो 

गण्याः अन् बेवडी म्हणजे ?

बंड्याः जी ऐका वेळेस दोन वड्या मागवते 😂



गण्याः म्हणजे आपण दोघेही टिटोटलर बेवडे!

राजवाडा

 बंड्याः गण्या, चल honest मध्ये जाऊ, जाम भूक लागली आहे 

गण्याः चल

बंड्याः तु काय खाणार ?


गण्याः मी राजकचोरी खाणार..


बंड्याः मग मी राजवाडा खाणार!

Teatotaller

गण्याः (पिता पिता) .. बंड्या, ऐ बंड्या .. teatotaller म्हणजे काय रे?

बंड्याः teatotaller म्हणजे .. आपलं हे रे 

गण्याः आपलं हे !!!

बंड्याः (विचार करून) अरे जो घरातला सगळा चहा टोटली संपवतो तो टिटोटलर (teatotaller )

गण्याः आणी बेवडा म्हणजे 

बंड्याः बेवडा म्हणजे जो एकाच वेळी नेहमी दोन वडापाव खातो

गण्याः म्हणजे आपण दोघेही टिटोटलर बेवडे!

Parenting

रोजच घेते घिरट्या पृथ्वी स्वतःभोवती 

गर्र गरा ग्गर गरगर गर 

बघतो जरी मी दिवास्वप्नं विश्रांतीचे

नकळतच जातात दिवस, दिवस गेल्यानंतर 

भर भर्रा भर भर भरभर

New year resolutions

बघता बघता पृथ्वीने 

मारली सुर्याभोवती अजून एक चक्कर

मी ही यंदा जोमाने दिली भवितव्यास टक्कर

अन् सुद्धुढतेसाठी सोडली मी शक्कर 

हेलपाट्यापाई मीच ठरलो खरा घनचक्कर

Commute

रोजच घेते घिरट्या पृथ्वी स्वतःभोवती 

गर्र गरा ग्गर गरगर गर 

बघतो जरी मी दिवास्वप्नं विश्रांतीचे

हेलपाट्यातच जातात दिवस 

भर भर्रा भर भर भरभर